Latest Marathi News

BREAKING NEWS

Sanjay Dutt : संजय दत्तकडून व्हायरल होत असलेल्या बातमीवर खुलासा

0 299

अभिनेता संजय दत्त कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’साठी बंगळुरू जवळ शूटिंग करत असताना त्याला दुखापत झाली आहे अशी बामती आज व्हायरल होत होती. शूटिंगदरम्यान बॉम्बस्फोटाचा सीन शूट केला जात असताना संजय दत्तला दुखापत झाल्याचं म्हटलं जातं होतं. पण संजय दत्त याने यावर खुलासा केला आहे.

संजय दत्त याने ट्विट करत म्हटले की, “मी जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की ते पूर्णपणे निराधार आहेत. देवाच्या कृपेने मी बरा आणि निरोगी आहे. मी केडी आणि चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दृश्यांचे चित्रीकरण करताना टीमने जास्त काळजी घेतली आहे.” “आपल्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आणि आपल्या काळजीबद्दल सर्वांचे आभार”

Manganga

संजय दत्त ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत आहे. संजय दत्त याने याआधीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. संजय दत्त हा रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटात देखील दिसला होता.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!