माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १२ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडीतील आदर्श को-ऑप क्रेडीट सोसायटीस दि. ३१ मार्च २०२३ अखेर निव्वळ नफा २0 लाख ७ हजार २४२ इतका झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दौंडे उपाध्यक्ष राजेद्र लाटणे व सचिव दत्तात्रय स्वामी यांनी दिली.
संस्थेचे हे सातवे आर्थिक वर्ष पूर्ण झाले आहे . चालू वर्षी शेअर मार्केटचा फटका बसल्याने व आर्थिक मंदीचा फटका असताना देखील सभासद खातेदार यांना विश्वासत घेऊन संचालक मंडळ, कर्मचारी व पिग्मी एजंट वर्गाने वसुलीस चांगले सहकार्य केले आहे.

माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अतिशय दमदार व यशस्वीपणे चालू आहे. संस्थेचे दि . ३१ मार्च २०२३ अखेर १६५६ सभासद असून ६२ लाख ८५ हजार वसुल भागभांडवल जमा आहे. सर्व प्रकारचे निधी ४३ लाख ८५ हजार असून गुंतवणुक १ कोटी ३४ लाख ९७ हजार आहे. संस्थेकडे ठेवी ४ कोटी ३३ लाख ३१ हजार च्या असून कर्ज वाटप ४ कोटी ४ लाख ६४ हजार इतके केले आहे.
थकबाकी ४.५५ टक्के इतकी आहे. सी.डी.रेशो ६८.५२ टक्के इतका आहे. संस्थेने आर्थिक वर्षात २४ कोटी ६३ लाख ९६ हजार चा व्यवसाय केला आहे. स्वनिधी १ कोटी १९ लाख २१ हजार असून एन.पी-ए २.५७ टक्के इतका आहे.
संस्थेने अल्पावधीत चांगली कामगिरी केली असून नावाप्रमाणे आदर्श वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या विश्वासावर संस्था काम करीत आहे . सर्वांना बरोबर घेवून संस्थेची प्रगती पथावर वाटचाल चालू आहे . भविष्यात संस्थेचे तालुका कार्यक्षेत्र करणेचा संचालक मंडळाचा विचार आहे . संपुर्ण कामकाज संगणकाव्दारे असून पिग्मी कलेकशन पिग्मी मशीनीव्दारे केले जाते.