Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्नाटक विधानसभा निवडणूक : उमेदवार यादी जाहीर होताच माजी उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा

0 559

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून भाजपानेही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु, या यादीत नाव न आल्याने नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधान परिषद सदस्य आणि भाजपा पक्षाचा राजीनामा दिला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे अथनी मतदारसंघातील तिकिट कापण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या सवदी यांनी विधान परिषद सदस्य आणि पक्षाचा राजीनामा दिला. “मी हातात कटोरा घेऊन फिरणाऱ्यांपैकी नाही. मी एक स्वाभिमानी राजनेता आहे. मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही,” अशी प्रतिक्रिया लक्ष्मण सवदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Manganga

अथनीचे विद्यमान आमदार महेश कुमठल्ली यांना बेळगाव जिल्ह्यातील अथनी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सवदी अथनी मतदारसंघातून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु, २०१८ मध्ये ते कुमथल्ली (तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते) यांच्याकडून सवदी यांचा पराभव झाला. होता. गुरुवारी सायंकाळी सवदी मोठा निर्णय घेणार असून शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचीही घोषणा लक्ष्मण सवदी यांनी केली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!