माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १२ एप्रिल २०२३ : सांगोला : सोलापूर जिल्हा भाजपचे तत्कालिक अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर निर्मला यादव या महिलेने लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याचे सांगत सोशल मिडियामध्ये व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते.
यानंतर श्रीकांत देशमुख यांना भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर निर्मला यादव या महिलेने सातत्याने श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करत आहे. आता या महिलेने माढ्याचे खास. रणजीतसिंह निंबाळकर यांनाच थेट इशारा दिला आहे.

याबाबत निर्मला यादव यांनी सोशल मिडियाद्वारे व्हिडीओ प्रसारित केला असून जर येथून पुढे जर श्रीकांत देशमुख व शशिकांत देशमुख हे दोन भाऊ तुमच्या सोबत दिसले तर गाठ माझ्याशी असून तुमची सगळी लफडी बाहेर काढण्याचा इशारा देत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत जाण्याची धमक असल्याचे नमूद केले आहे. सदरचा व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.