आयपीएल २०२३ मधील १६ वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. यामध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. तर दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथा सामना गमावला. मुंबईने विजयाचे खाते उघडले असले, तरी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची अपयशाची मालिका सुरूच आहे.
मुंबई ची फलंदाजी सुरु असताना तिलक वर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. परंतु सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा खाते न उघडताच बाद झाला आहे. तो गोल्डन डकवर बाद झाला. त्याला मुकेश कुमारने कुलदीप यादवकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादव मागील काही दिवसापासून खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाल होता. तेव्हापासून त्याला सूर गवसलेला नाही.

सुर्यकुमारला तीन सामन्यांत केवळ १६ धावा करता आल्या आहेत. सुपर किंग्जविरुद्ध केवळ 1 धावा करून तो बाद झाला. याआधी आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला केवळ १५ धावा करता आल्या होत्या. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो सलग तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला होता. २६ दिवसांत सूर्यकुमारचे हे चौथे गोल्डन डक आहे.