Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य : १२ एप्रिल २०२३ : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

0 743

मेष- पर्यटनाची आवड असणाऱ्यांना संधी मिळेल. काहींचे परदेश प्रवासाचे बेत ठरतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील.

वृषभ- अचानक धनलाभ होऊ शकतो. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. लोक मदत करतील. स्वतःची काळजी घ्या. दगदग कमी करा. अनोळखी लोकांपासून सावध राहा.

Manganga

मिथुन- नोकरी व्यवसायात यशस्वी वाटचाल कराल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मात्र, आपल्यामुळे कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आपल्या अनेक अडचणी दूर होतील, विरोधकांचा विरोध तात्पुरता मावळेल.

कर्क- आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. कामात अडथळा येऊ शकतो. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मित्र मंडळींची चांगली साथ राहील. प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा.

सिंह- नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. सुखसोयी वाढवून मिळतील. वाहन सुख मिळेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. जवळचे प्रवास होतील,

कन्या- नोकरीत नवीन संधी मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य नोकरी मिळेल. आत्मविश्वासाने कामे करण्याची गरज आहे. घरी पाहुणे मंडळी येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीची साथ राहील.

तूळ- उद्योग व्यवसायात ठिकठाक परिस्थिती राहील. फार मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्या. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांशी सख्य राहील. मनात थोडे काळजीचे विचार राहतील. मात्र, अनेकांची साथ राहील.

वृश्चिक- धनलाभ हाण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मनात सकारात्मक विचार राहतील.

धनु- मनात प्रसन्न विचार राहतील. ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. अडचणी दूर होतील. नोकरीत अनुकूल घटना घडतील. मात्र, वादापासून दूर राहा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांची काळजी घ्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा.

मकर- कला क्षेत्रात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. त्यांचे कौतुक होईल. काहींना प्रवास घडून येईल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. व्यवसायात यश मिळेल.

कुंभ- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. प्रवास कार्य साधक ठरतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. काहींना भेटवस्तू मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

मीन- नोकरीत नवीन संधी मिळेल. सहकाऱ्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाईल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!