देशातील सर्व नागरिकांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधार कार्ड आहे. शासकीय कार्यालयात सर्वात प्रथम आधार कार्डच मागतिले जाते. परंतु जर आपल्याकडे असलेले आधार कार्ड हरविले असेल तर या सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.
आधार कार्ड हरवले तरी तुम्ही ते डाउनलोड करून करून ठेऊ शकता. तुम्ही आधार पीव्हीसी कार्ड डाउनलोड करू शकता.आधार कार्ड डाउनलोड करण्याचे अनेक मार्ग आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता. जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुमच्याकडे त्याचा १२ अंकी आधार नंबर किंवा 28 अंकी नावनोंदणी आयडी क्रमांक असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
