सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये बरेच व्हिडीओ हे स्टंट करणाऱ्यांचे असतात. परंतु काही व्हायरल झालेले व्हिडीओ मार्मिक व सामाजिक देखील असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत होत आहे.
एक वयोवृद्ध व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन आपल्या मुलाची तक्रार करताना दिसत आहेत. मुलगा दारु पिऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करतो, अशी तक्रार संबंधित वयोवृद्ध व्यक्ती करत आहे. या वृद्धाची तक्रार ऐकल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने वयोवृद्ध व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली. तसेच मारहाण करणाऱ्या मुलाला धडा शिकवला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्वत: पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.

डीसीपी संतोष पटेल असं संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात सेवेवर आहेत. त्यांनी ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मुलाकडून मारहाण होणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीला कशाप्रकारे न्याय मिळवून दिला, याचा थोडक्यात आढावा दिला आहे.
VIDEO : वृद्धाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा