माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ११ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी ओंकार संतोष भंडारे वय २२ रा. खरसुंडी हा त्याच्या घरातून जेवण करून बाहेर फिरत असताना आरोपी सनी अर्जुन भंडारे रा, खरसुंडी याने फिर्यादीचे वडील संतोष व अर्जुन यांच्यात झालेल्या वादाच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळी करू नकोस असे म्हणत असताना आरोपी याने हातातील लोखंडी रॉडने मारहाण करून फिर्यादीस जखमी केले.

याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात कलम ३२५, ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोहेकॉ शिंदे अधिक तपास करत आहे.