माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ११ एप्रिल २०२३ : आटपाडी : विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन आरोपी विरुद्ध फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादीची कामथ येथे शेतजमीन आहे. या ठिकाणी असणाऱ्या जमिनीच्या चतु:सिमा ठरलेल्या नसतानाही आरोपी वसंत वायदंडे रा. पेरले ता. कराड व बयाजी संभाजी माने रा. कामथ ता. आटपाडी यांनी फिर्यादी यांना न विचारताच जमिनी मध्ये डांब रोवत असताना फिर्यादीने त्यांना डांब रोवू नका, जमिनीच्या अजून सरहद्दी ठरलेल्या नाहीत असे सांगत असताना, त्यांनी जमीन आमचीच आहे असे म्हणून फिर्यादी व फिर्यादी जाऊ यांना शिवीगाळी करून तुम्ही येथून चालते व्हा, तुम्हा दोघींना सोडणार नाही अशी दमदाटी करून फिर्यादीचा विनयभंग करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिसात कलम ३५४, ३५४(ब), ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोहेकॉ वगरे अधिक तपास करत आहे.