माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १० एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी शहरामध्ये बेकादेशीर पणे मटका घेणाऱ्यास ताब्यात घेवून त्याच्यावर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी अविनाश धनाजी लोखंडे वय २२ रा. दिघंची हा आटपाडी बाजार पटांगण येथील राजस्थानी कपड्याच्या सेलच्या दुकानाच्या पाठीमागे बेकायदा, बिगरपरवाना कल्याण नावाचा मटका जुगार लोकांच्याकडून पैसे स्वीकारताना आढळून आला.

याप्रकरणी त्याच्यावर आटपाडी पोलिसात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोहेकॉ ठोंबरे अधिक तपास करत आहे.