माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १० एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथील विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करून मारहाण केल्याने चार जणावर गुन्हा आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, करगणी येथील माहेर असणाऱ्या विवाहतेचा विठलापूर येथील दीपक भिमराव बाड याचे बरोबर लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी क्र १ दीपक भिमराव बाड 2) भिमराव बापू बाड ३) अमित भिमराव बाड ४) वंदना भिमराव बाड यांनी फिर्यादी हिचा हुंड्यासाठी पैशाची मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत तिला मारहाण केली. घर खरेदीसाठी माहेरहून सात लाख रुपये घेवून म्हणून तिला मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.

याप्रकरणी आटपाडी पोलिसात कलम ४९८(अ), ३२३,५०४, ३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ पाटील करत आहेत.