Latest Marathi News

BREAKING NEWS

सराईत मोटरसायकल चोरास अटक : १५ मोटारसायकलीसह चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत : आटपाडी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

0 4,602

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १० एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोरास अटक केली असून त्याच्याकडून १५ मोटारसायकलीसह चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची परीसरात पेट्रोलींग करीत असताना दिघंची एस टी स्टॅन्ड येथे रात्रीच्या सुमारास अजित भगवान खरात वय २० वर्ष रा. लेंगरेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली व रोहित बाळू शिंदे वय २९ वर्ष रा. करगणी ता. आटपाडी, जि. सांगली हे दोघे एका मोटारसायकल वरती थांबलेले दिसुन आले. त्यांचा संशय आलेने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे असलेल्या मोटार सायकलबाबत अधिक चौकशी केली असता सदरची मोटारसायकल ही त्यांनी दि.०८.०४.२०२३ रोजी फलटण जि.सातारा येथुन बसस्थानक परीसरातुन चोरली असल्याचे सांगीतले.

Manganga

 

त्यानंतर सदर आरोपींना ताब्यात घेवुन पो ठाणेस आणुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आटपाडी पो ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हातील मोटारसायकल चोरीची कबुली दिली. अटक मुदतीत त्यांना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी आटपाडी पो ठाणे हददीतुन २, विटा २, म्हसवड ३ पंढरपुर शहर ६ कराड १ व फलटन शहर १ अशा येथुन मोटार सायकल चोरी केले असलेचे सांगितले. त्यांच्याकडुन एकुण १५ मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या असुन त्यांना आज रोजी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्यांना ०२ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय अधिकारी पद्मा कदम यांच्या मागर्दर्शना खाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोउनि अजित पाटील, पोलीस कमर्चारी कोरवी, जाधव, कराळे, पाटील, मोरे, देशमुखे, सोनवणे यांनी केली असून  गुन्हयाचा पुढील तपास पोना/२००५ मोरे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!