माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १० एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील कामथ येथे एकास जातीवरून शिवीगाळी व धमकी दिल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कामथ येथे बयाजी संभाजी माने हे राहण्यास आहेत. ते पत्नी भामाबाई व मुलगी जयश्री लांडगे, पुतण्या बाळू माने व इतर मजुरांना घेवून कामथ गावचे हद्दीत असलेली जमीन गट नं. ३१५ मध्ये सरकारी मोजणी झाल्यावर सिमेंटचे डंब घेवून रोवण्यास गेले होते.

यावेळी आरोपी हौसाबाई अशोक सरक व शालन आण्णा सरक यांनी ही जमीन आमचे आहे असे म्हणत जातीवाचक शिवागाळी करून तुम्हाला सोडणार नाही म्हणत मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी बयाजी संभाजी माने यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भा.दं.वि. सहिता कलम ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.