Latest Marathi News

BREAKING NEWS

भर रस्त्यात तरुणांची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

0 112

उल्हासनगर : येथील कॅम्प नं-३, राधास्वामी सत्संग चौक येथील झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी घडला. मध्यवर्ती पोलिसांनी मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला असून मृत तरुणाचे नाव रतन उर्फ राजेश बहादूर लालचंद बिका असल्याचे उघड झाले.

उल्हासनगर राधास्वामी चौक येथील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. भर दिवसात व चौकात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले.

Manganga

पोलिसांनी अधिक तपास केला असता आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव रतन उर्फ राजेश बहादूर लालचंद बाका असून तो भावासह कॅम्प नं-१ येथील बिर्ला मंदिर परिसरातील एका लॉज मध्ये राहतो. तरुणांची हत्या की आत्महत्या? अशी चर्चा रंगली असून मध्यवर्ती पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!