माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. १० एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दिघंची व आटपाडी शहर येथून अज्ञात चोरट्याने मोटारसायकली लंपास केल्या आहेत. याबाबत आटपाडी पोलिसात सदर घटनेची नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिघंची येथील राजेंद्र मोरे हे त्यांची दुचाकी (MH-10-BP-6344) दिघंची येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारती समोर रस्त्याच्या कडेला लावली होती. परंतु अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. सदरची घटना ही दिनांक ०५ रोजी दुपारच्या दरम्यान घडली.

तसेच वाक्षेवाडी येथील पोलीस पाटील पांडुरंग सदाशिव मोटे हे त्यांची दुचाकी ( MH-10-CG-5983) आटपाडी बस स्थानक येथील पार्सल ऑफिस च्या समोर लावलेली होती. परंतु अज्ञात चोराने ती लंपास केली. सदरची घटना ही दिनांक ३० मार्च रोजी घडली आहे.
दोन्ही मोटरसायकल चोरीच्या घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.