सध्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली गौतमी पाटील ही एक सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. गौतमी पाटील हिला नृत्यदिग्दर्शक म्हणून देखील ओळखले जाते. तिने असंख्य विध्यार्थ्यांना भरतनाट्यम कलेचे प्रशिक्षण दिले आहे. आणि या शास्त्रीय नृत्य प्रकारातील सौंदर्य आणि विविधता दर्शवणारी अनेक निर्मिती निर्माण करण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
गौतमी पाटील हिला एक चांगली नृत्यांगना आणि कोरीओग्राफर म्हणून तिला यश मिळाले आहे. सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असणारी गौतमी पाटील लहानमुलापासून ते तरूण आणि म्हाताऱ्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या गौतमीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलचे कार्यक्रम बघण्यासाठी तुडुंब गर्दी देखील असते.

पण आता मात्र आपल्या अदांनी संपूर्ण तरुणाईला वेड लावणारी नृत्यांगना आता लग्नबंधनात अडकण्यासाठी उस्तुक आहे. आपल्याला कसा नवरा हवा हे देखील तिने सांगितले आहे. गौतमी पाटील ने तीच्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल सांगितले की मला पैसे नको मला माझ्या आयुष्यात कशाचीच गरज नाहीये मला पण माझ्या आयुष्यात जशी परिस्थिती येईल तेव्हा माझ्यासोबत उभा राहुन मला खंबीरपणे साथ देणारा नवरा हवा आहे. मी माझ्या घराची संपूर्ण जबाबदारी उचलली आता मला घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलेन असा मुलगा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन. अस गौतमी पाटील म्हणाली.