अवकाळी पावसामुळे झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर: मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
अकोला : सोसाट्याचा वारा व अवकाळी पावसामुळे दीडशे वर्ष जुने कडुनिंबाचे झाड टिनपत्र्याच्या सभामंडपावर कोसळून सात भाविक ठार झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात रविवारी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत १ गंभीर तर ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, झाड कोसळल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होते.
वादळी वाचामुळे पारस येथे अनेक घरांवरील टिनपत्रांसह सौर ऊर्जेचे पॅनल उडाले. त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घरातील साहित्य भिजले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

सदर घटनेबाबात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून त्यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली. पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेची एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली.