माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : सन 2023-24 या वर्षासाठी विधानपरिषदेच्या विशेषाधिकारी समितीच्या सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. असून या समितीवर आम. गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीच्या प्रमुख पदी म्हणून भाजपाचे प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर सदस्य म्हणून आमदार प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून देण्यात आली.
