आपल्या शेजारी असणाऱ्या बांगलादेश ने EVM मशीनवर बंदी घालत येथूण पुढे सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याचे जाहीर केले अन भारतामध्ये पुन्हा EVM मशिनवर आक्षेप घेत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपला ईव्हीएमवर विश्वास असल्याचे वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आज पुण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माझा ईव्हीएम मशीन वर विश्वास असल्याचे वक्तव्य केले.

जर EVM मध्ये घोळ करता आला असता तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते, असेही अजित पवार यांनी म्हटले. एवढ्या मोठ्या देशात एखादी गडबड कुणी करु शकत नाही असंही त्यांनी म्हटले. पराभवाचे कारण काही लोकं EVM वर ढकलून देत असल्याचेही पवार यांनी म्हटले.