Latest Marathi News

BREAKING NEWS

 

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याचे तोटे 

0 322

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याचे तोटे 

 

 

पचनासंबंधित समस्या
अधिक थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनाच्या क्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे तु्म्ही खाल्लेले अन्न पचन होण्यास समस्या येऊ शकते. थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, पोट दुखी, भीती वाटणे, पोट फुगणे अशा समस्या होऊ शकतात.

डोकेदुखी
सातत्याने अधिक थंड पाणी प्यायल्याने ब्रेन फ्रिजची समस्या होऊ शकते. तसेच मणक्याच्या येथे असलेल्या संवेदनशील नसांना सुद्धा ठंड करतात आणि लगेच तुमच्या मेंदूला संदेश पाठवतात. यामुळे तुमचे डोकं दुखण्यास सुरुवात होते. ज्या लोकांना सायनसची समस्या आहे त्यांच्यासाठी मुश्किल अधिक वाढू शकते.

हृदयाचे ठोके मंदावतात
अधिक थंड पाणी प्यायल्याने हृदयाचे ठोके मंदावात. यामुळे शरिरातील अनैच्छिक कार्य नियंत्रित करणाऱ्या तंत्रिकांना उत्तेजिक करतात. ज्याला वेगस तंत्रिका असे म्हटले जाते. हे नर्व सिस्टमचा फार महत्वाचा भाग असतात. खरंतर वेगस नर्व पाण्याच्या कमी तापमानामुळे अधिक प्रभावित होतात. ज्यामुळे हृदयाची गति अत्यंत मंदावते. परंतु ही स्थिती तुमच्या हृदयाच्या कार्यासाठी उत्तम नाही. यामुळे हृदयासंबंधित अन्य समस्या उद्भवू शकतात.

बद्धकोष्ठतेची समस्या
जर एखादा व्यक्ती सातत्याने थंड पाणी पित असेल तर त्याला बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा जेवण शरिरात गेल्यानंतर थंड पाण्यामुळे ते कडक होते. आतड्यांचे आकुंचन होते आणि यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

वजन वाढण्याची भीती
जेव्हा एखादा व्यक्ती अधिक थंड पाणी पितो तेव्हा शरिरात असलेले फॅट बर्न होण्यास समस्या निर्माण होते. थंड पाणी शरिरातील फॅट कठोर बनवतात, ज्यामुळे ते कमी करण्यास समस्या येते. अधिक थंड पाणी प्यायल्याने वजन वाढू शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.