माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ०८ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी आगार येथील कर्मचारी मुरलीधर बागुल यांची मुलगी योगेश्वरी मुरलीधर बागुल (वय १६) हिने काल दि. ०७ रोजी सांयकाळी ६.०० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मुरलीधर बागुल हे आटपाडी बस डेपो येथे हेल्पर म्हणून नोकरीस असून सुरेश गॅस इण्डेन च्या शेजारी असणाऱ्या भाड्याच्या खोलीत आपल्या कुटुंबीयास राहत होते. काल दि. ०७ रोजी सायंकाळ ६.०० च्या दरम्यान घरामध्ये कोणी नसताना योगेश्वरी हिने घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतला. ही बाब घरातील लोकांच्या लक्षात येताच तिला ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तिचा मृत्यू झाला होता. योगेश्वरीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
