माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०७ एप्रिल २०२३ : आटपाडी : हॉटेल कामगाराकडून दोन लाख ९६ हजार रुपये रोख व मोटारसायकल असे एकूण तीन लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आटपाडी येथील एका हॉटेल घडल्याने याबाबत आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी बायपास रोडवरती गेळे बंधू यांचे हॉटेल सुशांत आहे. याठिकाणी दत्तात्रय बाळासो गोडसे रा. महूद-पवारवाडी ता. सांगोला जि, सोलापूर हा कामाला होता. आज सकाळी ६.३६ च्या दरम्यान आरोपी दत्तात्रय गोडसे याने किचन मधील तांदळाच्या डब्यात ठेवलेली २,९६,०००/- हजार रुपये रोख व हॉटेलच्या काऊटरला असलेली दुचाकीची किल्ली घेवून चोरून घेवून गेला.

याबाबत सुशांत गेळे याच्या फिर्यादी वरून आरोपी दत्तात्रय बाळासो गोडसे याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात भा.दं.वि.कलम ३८१ प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ गारळे करत आहेत.