चेक बाउंस झाल्यानतंर बँक ग्राहकांकडून दंड वसूल करतात. हा दंड वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे चार्जेस ही आहेत. हा दंड १५० रुपये ते ७५० ते ८०० रुपयांपर्यंत असू शकतो. त्याला २ वर्षांची शिक्षा अथवा चेकमध्ये दिलेल्या रक्कमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात.

आपल्याकडे चेक बाउंस होणे एक गंभीर गुन्हा मानला जातो. नियमांनुसार जर एखादा चेक बाउंस झाला तर एका महिन्याच्या आतमध्ये देणगीदाराने जर चेकचे पेमेंट केले नाही तर त्याच्या नावे लीगल नोटीस जारी केली जाते. त्यानंतर नोटीसवर उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जातो. अशा व्यक्तिच्या विरोधात Negotiable Instrument Act, 1881 सेक्शनच्या १३८ अंतर्गत केस दाखल केली जाऊ शकते. या प्रकरणामध्ये दंड सुद्धा लावला जाऊ शकतो किंवा दोन वर्षांच्या तुरुंगाची शिक्षा ही होऊ शकते. अथवा दोन्ही कारवाया केल्या जाऊ शकतात.