तरुणांपासून सगळ्यांनाच मोबाईलवर रिल बघण्याचे व्यसन जडले आहे. त्यात आता प्राणीही मागे राहिले नाहीत. यामध्ये आता माकडाची भर पडली आहे. माणसांप्रमाणे माकडांची बुद्धीही दिवसेंदिवस तल्लख होत असल्याचे व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून दिसत आहे.
सध्या देशात इंटरनेटचा वापर घरोघरी होत असतानाच आता मोबाईलवर रिल बघणाऱ्या माकडांनं वेध लागले आहेत. मोबाईल हातात घेतल्याशिवाय माणसांची सकाळ होत नाही. तर दुसरीकडे माकडंही मोबाईलमध्ये रील बघत असल्याचे या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका महिलेच्या बाजूला बसून हे माकड मोबाईल हातात घेऊन रिल पाहत आहे आणि एक एक रिल स्क्रोल करत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत पोहचला असून भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केला असून या व्हिडीओ ला नेटकरी गमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.