माणदेश एक्सप्रेस न्यूज : दि. ०७ एप्रिल २०२३ : आटपाडी : मापटेमळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हणमंत गळवे व जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालिका दिपाली गळवे यांचा मुलगा सुशांत गळवे (वय २१) याने आज सकाळी १० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हणमंत गळवे यांचा मुलगा सुशांत हा पुणे येथे शिक्षण घेत होता. नुकताच तो गावी आला होता. आज सकाळी १० च्या सुमारास त्याने राहत्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या वाचनालयाच्या इमारती मध्ये गळफास घेत आत्हीमहत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या दुर्दैवी घटना समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
