दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता नानी व अभिनेत्री किर्ती सुरेश मुख्य भूमिकेत असलेल्या ‘दसरा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला सुरूच आहे. ३० मार्चला रामनवमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत १०० कोटींची कमाई केली आहे.
हे ही वाचां :- Hyundai Venue मध्ये तीन इंजिन पर्याय, वैशिष्ट्ये आणि किंमत पाहण्यासाठी क्लिक करा

‘दसरा’ने प्रदर्शनाच्या दिवशी १७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ कोटींची कमाई करत या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरात ५३ कोटींचा गल्ला जमवला होता. आता चित्रपचट प्रदर्शनाच्या सहा दिवसांतच दसरा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
हे ही वाचा :- Xiaomi 12 Pro 5G किंमत आणि ऑफर
नानीच्या ‘दसरा’ या चित्रपटाचे ६५ कोटींचं बजेट आहे. कमी बजेट असूनही या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.