सांगली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : पिडीता आणि साक्षीदार फितूर होऊनही आरोपीला २५ वर्षे सक्तमजुरी
सांगली : सांगली : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पिडीता आणि साक्षीदार फितूर होऊनही आरोपीला न्यायालयाने इतर पुरावे या आधारे २५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी ही शिक्षा ठोठावली.
हे ही वाचा :- आटपाडी बाजार समिती निवडणुकीसाठी ०८ अर्ज नामंजूर तर १५९ अर्ज मंजूर

याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुपवाड येथील तरूण सद्दाम हुसेन शहा (वय ३२) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी गुरूवारी २५ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पिडीता व साक्षीदार असलेली महिला फितूर होउनही न्यायालयाने ही अन्य पुराव्याच्या आधारे संशयिताला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.
हे ही वाचा :- सांगली जिल्ह्यासाठी कोविड रूग्णांसाठी मदत कक्ष व हेल्पलाईन सुरू
पिडीता घरी एकटी असताना संशयित आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यातून पिडीता गरोदर राहिली. यामुळे ही बाब समोर आली. पिडीतेला एका संस्थेत दाखल केल्यानंतर तिथे तीने एका बाळाला जन्म दिला. मात्र, संबंधित संस्थेने याबाबत पोलीस ठाण्यात कळविले. यानंतर संबंधित तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासह तरूण व मुलीची डीएनए चाचणी केली असता लैंगिक अत्याचारातून संशयित मुलाचा पिता असल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा :- Post Office News : ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही बनवणार करोडपती !
खटला सुरु असताना पिडीता व साक्षीदार यांनी संशयिताला मदत करण्याची भूमिका घेतली. मात्र, अन्य पुराव्याच्या आधारे आणि डीएनए चाचणीचा प्रयोगशाळेतील अहवाल यावर संशयित आरोपी दोषी असल्याचे सिध्द होत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. या प्रकरणी २५ वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.