Xiaomi 12 Pro 5G : प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट कडून Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोनवर बंपर सूट देण्यात येत आहे.
Xiaomi 12 Pro 5G या स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंट असलेल्या मॉडेलवर फ्लिपकार्टकडून मोठी सूट दिली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत.

Xiaomi 12 Pro 5G तपशील
Xiaomi 12 Pro 5G मध्ये 6.73 इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 3200×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेटचा सपोर्ट आहे. हा फोन Android 12 OS वर चालतो.
फोनमध्ये 50MP + 50MP + 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 120W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh बॅटरी आहे.
उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये मिळत असल्याने ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. तसेच कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन देखील मिळत आहे. फ्लिपकार्टच्या ही ऑफर काही काळापुरतीच मर्यादित असेल.