माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०६ एप्रिल २०२३ : आटपाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. आज दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच दिवस होता. काल आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये ०८ अर्ज नामंजूर करण्यात आले तर १५९ अर्ज मंजूर करण्यात आले.
हे ही वाचा :- सांगली जिल्ह्यासाठी कोविड रूग्णांसाठी मदत कक्ष व हेल्पलाईन सुरू

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातुन ६९ अर्ज मंजूर तर ४ अर्ज नामंजूर झाले. सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातुन १५ अर्ज मंजूर तर १ अर्ज नामंजूर झाला. सहकारी सास्न्था इ.मा. प्रवर्ग मतदार संघातुन ५ अर्ज मंजूर तर १ अर्ज नामंजूर झाला. सहकारी संस्था भ.जा.वि.ज. मतदार संघातुन ८ अर्ज मंजूर तर १ अर्ज नामंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातुन २० अर्ज मंजूर झाले. ग्रामपंचायत अनु.जाती-जमाती राखीव मतदार संघातुन १० अर्ज मंजूर झाले.
हे ही वाचा :- Post Office News : ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही बनवणार करोडपती !
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघातुन ९ अर्ज मंजूर तर ०१ अर्ज नामंजूर झाला. हमाल व तोलाईदार मतदार संघातुन ०५ अर्ज मंजूर झाले. तर एकूण १५९ उमेदवारांचे अर्ज मंजूर व ०८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात झाले. आज दि. ०६ एप्रिल रोजी मंजूर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
हे ही वाचा :- Ration Card News : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! अन्यथा “यांची” रेशन कार्डे होणार रद्द….