आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०५ एप्रिल २०२३ रोजी कोरोनाचे ०३ नवे रुग्ण : गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट सक्रीय झाली होती. परंतु त्यानंतर मात्र वातावरण शांत होते. त्यामुळे कोरोना बाबतीत नागरिक बिनधास्त होते. परंतु आता तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळून येवू लागले असून खरसुंडी आरोग्य केंद्रात तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
आज दिनांक ०४ रोजी तालुक्यातील दिघंची आरोग्य केंद्रात ०३, करगणी आरोग्य केंद्रात ०३ तर खरसुंडी आरोग्य केंद्रात १८ अशी एकूण २४ नागरिकांनी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये आवटेवाडी ०१, चिंचाळे, ०१ व वलवण येथील ०१ असे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

रूग्णामध्ये पुरुष रुग्ण ०३ व स्त्री रुग्ण ०० असे एकूण ०३ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.