Latest Marathi News

BREAKING NEWS

KKR ला मोठा धक्का ! ‘या’ स्टार खेळाडूने IPL खेळण्यास दिला नकार

0 130

कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. कोलकाताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने यंदाच्या मोसमात खेळण्यास नकार दिला आहे. शाकिबने बांगलादेशातूनच कोलकाता संघ व्यवस्थापनाशी बोलून आपला निर्णय स्पष्ट केला.

बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूने औपचारिकपणे कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीला हंगामासाठी त्याच्या अनुपलब्धतेची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बांधिलकी आणि वैयक्तिक कारणांमुळे त्याने लीगमधून माघार घेतल्याचे मानले जाते.

Manganga

यावेळच्या लिलावात शाकिबला कोलकाताने 1.50 कोटी रुपयांना विकत घेतले. इतर कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नव्हती. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे शाकिब अल हसनने आतापर्यंत आयपीएल 2023 चा एकही सामना खेळलेला नाही. तो 8 एप्रिलनंतर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सहभागी होणार होता.

बांगलादेशला 4 एप्रिलपासून आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळायची आहे. बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासलाही आयपीएल 2023 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. आयर्लंडविरुद्धचा हा कसोटी सामना संपल्यानंतर तो संघात सामील होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!