Latest Marathi News

BREAKING NEWS

एमपीएससी, युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणी अर्ज करण्याचे आवाहन

0 534

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. 04 एप्रिल २०२३ : सांगली : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी याकरीता विविध योजना राबविण्यात येतात. महाज्योतीतर्फे सन 2023-24 साठी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

 

हे ही वाचा :-  आटपाडी पोलिसांनी दमदार कामगिरी : घरफोडी प्रकरणातील फरारी आरोपीस अटक : एक लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात

Manganga

एमपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास संस्थेत प्रशिक्षणाकरीता रुजू होतील त्या दिनांकापासुन महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच प्रतिमाह 10 हजार रूपये विद्यावेतन लागू होईल व एकवेळ आकस्मिक खर्च 12 हजार रूपये देण्यात येईल.

 

हे ही वाचा :-  खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?

युपीएससी परिक्षापूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्यांचे पूर्व, मुख्य तसेच व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबत अभ्याससाहित्य घरपोच देण्यात येईल. पुणे येथे प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 10 हजार रूपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ आकस्मिक खर्च 12 हजार रूपये आकस्मिक खर्च देण्यात येईल. दिल्ली येथे ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना 13 हजार रूपये प्रतिमाह विद्यावेतन व एकवेळ 18 हजार रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल.

 

हे ही वाचा :-  आटपाडी : सिद्धनाथ पतसंस्थेस ५० लाख रुपयांचा नफा : चेअरमन साहेबराव पाटील यांची माहिती

अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वैध नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, मार्कशीट अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक जोडावे, पासबूक किंवा रद्द केलेला धनादेश जोडावा. प्राप्त अर्जांची निकषानुसार छाननी करून विद्यार्थ्यांची राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

 

एमपीएससी, युपीएससी परीक्षापूर्व प्रशिक्षण नोंदणी अर्ज करण्यासाठी क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!