Latest Marathi News

BREAKING NEWS

सायरन वाजताच लोक फोन, टीव्ही, लॅपटॉप करतात बंद ! कारण वाचून तुम्ही कराल कौतुक…

0 424

देशामध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर खूप वाढला आहे. बऱ्याच लोकांना आता याशीं जगणे कठीण झाले आहे. त्याच्या जवळ मोबाईल नसला किंवा त्याची रेंज जरी केली तरी त्यांना कासावीस होते. पण सांगली जिल्ह्यात असे एक गाव आहे जिथे संध्याकाळी सायरन वाजताच लोक २ तास स्वत:ला स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून दूर ठेवतात. म्हणजे सर्व मोबाईल, टीव्ही पूर्णपणे बंद करून ठेवतात.

हे ही वाचा : प्रेरणादायी : कोळा येथील गवंड्याच्या मुलाने केली चित्रपट निर्मिती : चित्रपट येणार लवकरच सिनेमागृहात

Manganga

सांगली जिल्ह्यातील मोहितांचे वडदगाव येथे दररोज संध्याकाळी ७ वाजता एक सायरन वाजतो. सायरनचा आवाज ऐकून ग्रामस्थ दीड तासांहून जास्त वेळ आपला मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट बंद करतात. एवढेच नाही तर गावातील काही लोक घरोघरी जाऊन कोणी गॅझेट्सचा वापर तर करत नाहीत ना याची तपासणी करतात.

हे ही वाचा :  Video : ‘इडली फॅक्टरी’ तुम्ही बघितली आहे का? उद्योगपती आनंद महिंद्रा झालेत ‘फिदा’, म्हणाले…

कोरोना कालखंडात बहुतेक लोकांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट याचे व्यसन लागले होते. पण लॉकडाऊन संपला तरी लोकांमध्ये हे व्यसन जसेच्या तसे राहिले. परंतु लोकांना या व्यवसनापासून दूर करण्यासाठी दररोज सुमारे २ तास कोणीही कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स या गावामध्ये वापरल्या जात नाहीत.

हे ही वाचा : OnePlus Nord CE 3 Lite, किमंत व इतर फीचर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!