Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रेरणादायी : कोळा येथील गवंड्याच्या मुलाने केली चित्रपट निर्मिती : चित्रपट येणार लवकरच सिनेमागृहात

0 1,945

सोलापूर जिल्ह्यातील कोळे या गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील एका गवंड्याचा मुलगा संग्राम भिमराव काटे या मुलाने एक वर्षांपूर्वी एक मराठी ऍक्शन चित्रपट बनवण्याचा ध्यास मनात ठेवून चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटाचे नाव “उगराट” असे असून हा चित्रपट फुल ॲक्शन, रोमान्स, लव्ह स्टोरी, कॉमेडी, मैत्री अशा सर्व गोष्टींनी भरलेला असून या चित्रपटाचा मुख्य उद्देश हा खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांवरती होणारा अन्याय अत्याचार यावर “उगराट ” हा चित्रपट आधारित आहे.

हे हि वाचा :- आटपाडी पोलिसांनी दमदार कामगिरी : घरफोडी प्रकरणातील फरारी आरोपीस अटक : एक लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात

Manganga

या चित्रपटाची निर्मिती संग्राम काटे (S.K. ) प्रोडक्शन या बॅनर वरती झालेली असून या चित्रपटाचे निर्माते लेखक संग्राम काटे, सहनिर्माते बहुचर्चित बिजनेस मॅन अशोक नरळे फलटणे हे असून या चित्रपटामध्ये प्रमुख नायक संग्राम काटे, प्रमुख नाईका सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का फेम प्राची पालवे, रील स्टार सानिका शिंदे असून या चित्रपटांमध्ये सैराट फेम भक्ती चव्हाण, स्टार प्रवाह वरील लक्ष मालिका फेम अनिकेत केळकर, खलनायक म्हणून राजेंद्र जाधव, प्रीतम भंडारे, अशोक ठोंबरे व आशिष वाघमारे असे नावाजलेले कलाकार आहेत.

हे हि वाचा :-  कु.आलिया मुजावर हिचे यश

या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आकाश तुळसे यांनी केलेले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हे कोळे व कोळा परिसरामध्ये तसेच तिप्पेहाळी येथील नरळे फलटणे फार्म हाऊस, जुनोनी, पाचेगाव, किडेबिसरी, गौडवाडी, नागज, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर अशा बऱ्याच ठिकाणी झालेले आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास एक वर्षापूर्वी सुरुवात झाली होती. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये संग्राम काटे यांना चित्रीकरण करते वेळी बऱ्याच आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागले. पण कोळे गावातील व तिप्पेहाळी, जुनोनी परिसरातील नागरिकांनी हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी बरेच योगदान दिले.

हे हि वाचा :-  खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?

यामध्ये अशोक नरळे (फलटणे) सर, श्रीमंत सरगर शेठ, सचिन देशमुख, सुरेश आलदर, नामदेव मदने, शहाजी हातेकर, तुकाराम (दादा) पुढारी, प्रल्हाद मेटकरी, दिलीप देशमुख, हरिभाऊ कोळेकर, शिवाजी कोळेकर, दगडू कोळेकर, किरण पांढरे, संतोष करांडे, विष्णू नरळे, भिमराव आलदर, प्रभू कोरे, सचिन मोहिते, रमेश माळी, गणेश देशमुख, अरुण बजबळकर, निलेश मदने, श्रीकांत मोरे ,राजू काटे, यांच्यासह कोळा, जुनोनी परिसरातील अनेक नागरिकांनी आपापल्या परीने संग्राम काटे यांना मोलाचे आर्थिक व मानसिक योगदान दिले. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ‘उगराट’ चित्रपटाची संपूर्ण टीम व कोळा, तिप्पेहाळी व जुनोनी परिसरातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले असून अनेक अडचणीवर मात करत उगराट चित्रपट पूर्ण झाला असल्याचे चित्रपट निर्माते संग्राम काटे यांनी सांगितले.

हे हि वाचा :-  Video : ‘इडली फॅक्टरी’ तुम्ही बघितली आहे का? उद्योगपती आनंद महिंद्रा झालेत ‘फिदा’, म्हणाले…

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!