सध्या सोशल मिडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. इडली बनवणाऱ्या एका खाद्यगृहाचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. भारतातील प्रमुख उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील या व्हिडीओ ची भुरळ पडली असून त्यांची त्यांच्या अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
खरे तर इडली हा दक्षिणात्य पदार्थ. देशातील अनेक भागांमध्ये प्रसिद्ध आहे. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओतील साचा म्हणजेच भांडी ही वेगळीच असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे इडली फॅक्टरीच्या या व्हिडिओतील व्यक्ती एकावेळी सुमारे १०० ते २०० इडली बनवत असल्याचे दिसून येते. ही एवढी मोठी इडलीसाठीची भांडी देखील काहीजणांनी पहिल्यांदाच पाहिली असतील. या व्हिडिओतील इडली करण्याची पद्धत पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आनंद महिंद्राच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर इडली बनवताना दिसत आहे. प्रथम तो इडलीसाठी पीठ तयार करतो आणि नंतर इडलीच्या साच्यात ओततो. त्यानंतर काही वेळातच साच्यांमधून एक व्यक्ती या इडल्या काढत असतो. या इडल्यांचा थर पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओतील इडली या अगदी स्पंज असल्याचा भास पाहणाऱ्याला होतो; पण त्या इडलीच आहेत. त्याचबरोबर इडलीसोबतची चटणी देखील करण्याची पद्धत पाहण्यासारखी आहे.