Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी पोलिसांनी दमदार कामगिरी : घरफोडी प्रकरणातील फरारी आरोपीस अटक : एक लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात

0 3,418

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०३ एप्रिल २०२३ : आटपाडी : आटपाडी पोलिसांनी दमदार कामगिरी करत घरफोडी प्रकरणातील फरारी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी बबन बिरा काळे, वय २५ वर्षे, रा. हाजापुर, ता. मंगलवेढा जि. सोलापुर हा मापटे मळा, आटपाडी येथे आला असलेबाबत गोपनीय बातमीदार यांचे मार्फत बातमी कळल्याने, आटपाडी पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/८६० आवळे, पोहेकॉ/२५९९ गारळे, पोहेकॉ/१५६५ कदम, पोकॉ/१९९७ रोडे असे मापटे मळा, आटपाडी येथे जाऊन आरोपी बबन बिरा काळे, वय २५ वर्षे, रा. हाजापुर ता. मंगळवेढा यांचेकडे चौकशी केली असता, त्याने तसेच त्याचे इतर साथीदार देवगण विजय पवार, अमोल विजय पवार यांनी मिळुन अंकुश बापु दबडे, वय २७ वर्षे, व्यवसाय- स्पेअर पार्ट, रा. सोमेश्ववरनगर, आटपाडी ता. आटपाडी यांचे बंद घराची चोरी करुन त्यातील मुद्देमाल चोरी केला असलेची कबुली दिलेली होती.

Manganga

सदर बाबत आटपाडी पोलीस ठाणेस दि.२९.०३.२०२३ रोजी अंकुश बापु दबडे, वय २७ वर्षे, व्यवसाय- स्पेअर पार्ट, रा. सोमेश्ववरनगर, आटपाडी ता. आटपाडी यांनी पोलीस ठाणेस गु.र.नं १०१/२०२३ भा.दं.सं कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोनि शरद मेमाणे सो] यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/९१५ विकास जाधव हे करीत आहेत.

तपासी अंमलदार पोहेकॉ/९१५ विकास जाधव व पोहेकॉ/१८६० दादासाहेब ठोंबरे यांनी आरोपी बबन बिरा काळे, रा. हाजापुर यास नमुद-गुन्ह्याचे कामी अटक करुन त्याचेकडुन गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे गंटण व बोरमाळ, दुचाकी असा एकुण १,३०,०००/- रु चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

सदरची कारवाई ही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मेमाणे, पोहेकॉ/१८६० दादासाहेब ठोंबरे, पोहेकॉ/९१५ विकास जाधव, पोहेकॉ/१५६५ विजय कदम, पोहेकॉ/ २५९९ नारायण गारळे, पोहेकॉ/८६० महेश आवळे, पोहेकॉ/ ६८३ आटपाडकर, पोहेकॉ/१६९८ सुखदरे, पोअं/१९९७ प्रमोद रोडे, पोअं/२२३६, महेश काळे, पोअ/२२३१ तुकाराम ढाले यांनी केलेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!