सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत
सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले
होते. यावेळी एकाने गेल्या 11 वषार्पासून त्याची फाईल
मंजूर न केल्याने आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर एकच खळबळ उडाली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर महापालिकेचे सर्व कमर्चारी मुख्यालयात जमले होते. त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महापालिका कायार्लयात तणावाचे वातावरण आहे.द रम्यान ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एकाला ताब्यात घेतले आहे. कैलास काळे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
आज सोमवारी महापालिकेतर्फे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सांगलीतील मुख्यालयात हा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी कैलास काळेही उपस्थित होते. त्यांनी गुंठेवारी नियमतीकरणासाठी 2012 मध्ये फाईल महापालिकेत दिली होती. ती मंजूर न झाल्याने ते संतप्त झाले. यावेळी आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांशी काळे यांचा वाद झाला.

यावेळी काळे यांनी आयुक्तांच्या दिशेने बूट फेकला. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने फौजफाट्यासह महापालिकेत पोहोचले. त्यांनी काळे याला ताब्यात घेतले. दरम्यान आयुक्तांच्या दिशेने बूट
फेकल्याची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी,
कमर्चारी मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलनाची घोषणा केली. यावेळी महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला.