माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०२ एप्रिल 2023 : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथील कु. आलिया असिफ मुजावर हिने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळविले असल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये नुकतीच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा संपन्न झाली होती. यामध्ये बनपुरी बारवकर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.
या स्कॉरलशिप परिक्षेत कु. आलिया मुजावर हिने 100 पैकी 94 गुण मिळवत सिल्व्हर मेडल मिळविले. तिच्या या यशाबद्दल तिचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाळेचे मुखयाध्यापक, शिक्षक यांनी तिचे अभिनंदन करत तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.