माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. 03 एप्रिल 2023 : खानापूर तालुक्यातील करंजे येथे दोन दुचाकी ची समोरासमोर धडक झाली असून या अपघाता मध्ये दोन गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वायफळे दुचाकी वरून भिवघाट कडे निघाली होती. यावेळी दुचाकी करंजे जवळ अग्रणी नदी जवळ आली असता यावेळी स्कूटी व हिरो होंडा गाडाची समोरासमोर धडक झाली.

अपघाता नंतर गाडी वरून दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. अपघाता नंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. जखमींना अपघाता नंतर रुग्णालयात पुढील उपारासाठी नेण्यात आले आहे. सदरचा अपगात 11.30 च्या दरम्यान झाला.