Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेस आणि राहुल गांधींना सावरकर समजणार नाहीत : आम. गोपीचंद पडळकर यांची टीका : आटपाडीत ‘सावरकर गौरव’ यात्रा संपन्न

0 519

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०२ एप्रिल २०२३ : आटपाडी : काँग्रेस आणि राहुल गांधींना सावरकर समजणार नाहीत, कारण ती त्यांची पात्रता नाही अशी टीका आम. गोपीचंद पडळकर यांनी राहुल गांधी, व काँग्रेसवर केली. आटपाडी येथे ‘सावरकर गौरव’ यात्रे प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे सौम्य भाषा वापरत काँग्रेसला समज दिल्याचे सांगत आहेत. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी, असेही आमदार पडळकर म्हणाले.

Manganga

यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी जि.प. सदस्य अरुण बालटे, आरपीआयचे राजेंद्र खरात, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, युवा नेते जयवंत सरगर, बनपुरीचे महादेव पाटील, विनायक पाटील, अनिल पाटील, राहुल गुरव, प्रणव गुरव यांच्यासह कार्यकर्ते यांनी सावरकर यांच्या प्रतिमेसह भगवे झेंडे आणि भगव्या टोप्यासह सहभाग नोंदवला.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!