Latest Marathi News

BREAKING NEWS

सोने चोरी प्रकरण : विटा पोलिसांनी केला खुलासा : काय म्हणाले, पोलीस निरीक्षक संतोष डोके, वाचा सविस्तर

0 2,774

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०२ एप्रिल २०२३ : विटा : विटा पोलिसांनी सोने चोरी प्रकरणाचा तपास करताना तब्बल दीड किलो सोने हडप केली असल्याची तक्रार या प्रकरणातील संशियत सागर जगदाळे रा. रामनगर-करगणी याने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली होती. या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस प्रमुख यांनी घेतली असून विट्याच्या पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

परंतु विटा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी या बाबत खुलासा केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, विटा पोलीस स्टेशनमध्ये सुरज मकबूल मुल्ला यांनी तक्रार दिली की त्यांच्या ओळखीचा सागर मंडले हा कलकत्ता येथे जाणार होता. त्यांच्या कडे त्यांनी त्यांनी 100 ग्रॅम सोने त्यांच्या दुकानात देण्यासाठी दिले होते.

Manganga

त्याचबरोबर त्यांचे पार्टनर शंकर जाधव रा. मेंगणवाडी, ता. खानापूर यांच्याकडील 455 ग्रॅम सोने हे सुद्धा सागर मंडले याच्याकडे देण्यात आलेलं होते. परंतु 13 तारखेला दिलेले सोने अद्याप पर्यंत त्यांचा दुकानात मिळाले नसल्याने त्यांनी याबाबत गुन्हा दाखल केला.

सदर गुन्हा दाखल केल्यानंतर तपास करत असताना पोलिसांची माहिती मिळाली की हे सोने सागर बाबाजी जगदाळे वय 24 वर्ष रा.करगणी याच्याकडे आहे. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी अटक करण्यात आली. अटक करून न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर रिमांड मुदतीत त्याच्याकडून 100 ग्राम सोने त्यांनी जिथे लपून ठेवले होते तेथून हस्तगत केले.

त्यानंतर त्यांनी 455 ग्रॅम सोने हे त्यांच्या ओळखीचे प्रकाश गायकवाड (रा. शेटफळे ता. आटपाडी) आणि हणमंत सोनार यांच्या मदतीने ज्याच्याकडे दिले होते त्या सोनाराकडून जप्त करण्यात आले. एकूण 555 ग्रॅम सोने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि या आरोपींना वेळोवेळी अटक करून न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले आहे. यातील आरोपी सागर बाबाजी जगदाळे यांनी अर्ज केलेला हा चुकीचा असून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही.

संबंधित बातम्या 

 

* पोलिसांनीच चोरीतील दीड किलो सोन्यावर मारला डल्ला : करगणी-रामनगर येथील संशयिताची जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार

 

* सोने चोरी प्रकरणी पोलिसांवर झालेल्या आरोपांची होणार उपअधीक्षकांमार्फत होणार

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!