Latest Marathi News

BREAKING NEWS

सोने चोरी प्रकरणी पोलिसांवर झालेल्या आरोपांची होणार उपअधीक्षकांमार्फत होणार

0 1,114

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०२ एप्रिल २०२३ : विटा : आटपाडी : विटा पोलिसांनी सोने चोरी प्रकरणाचा तपास करताना तब्बल दीड किलो सोने हडप केली असल्याची तक्रार या प्रकरणातील संशियत सागर जगदाळे रा. रामनगर-करगणी याने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे केली होती. या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस प्रमुख यांनी घेतली असून विट्याच्या पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा :- Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी तोडले अकलेचे तारे : महात्मा गांधी बाबत पुन्हा वादग्रस्त विधान

Manganga

१६ फेब्रुवारी रोजी विटा पोलिस ठाण्यामध्ये सूरज मकबुल मुल्ला याने खोटी तक्रार दिली होती. त्याने आपल्या दुकानात कामास असणाऱ्या सागर लहू मंडले यास कोलकाता येथे घेऊन जाण्यासाठी विटा येथे १०० ग्रॅम सोने दिले होते, तसेच शंकर जाधव यांचेही ४५५ ग्राम सोने त्याच्याकडे होते. मात्र कोलकात्यास पोहचले नाहीत. त्यामुळे त्याने सोन्याची चोरीची तक्रार दिली होती.

हे ही वाचा :-  Video : साडी नेसून महिलांनी गाजवलं फुटबॉलचं मैदान : व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक

तपासाच्या दरम्यान विटा पोलिसांनी सागर मंडले याचा मित्र सागर जगदाळे याला ताब्यात घेत, सागर मंडले सोने घेऊन फरार असल्याचे सांगितले. यावेळी सागर जगदाळे याने सागर मंडले याने आपल्याकडे दोन किलो सोने दिल्याचे सांगितले. यापैकी ४५५ ग्रॅम सोने विकले असून, राहिलेले १,५४५ ग्राम सोने आपल्या बहिणीकडे ठेवल्याची कबुली दिली. यानंतर, पोलिसांनी हे सोने ताब्यात घेतले. सागर जगदाळे यास चार दिवस पोलिस ठाण्यात ठेवून अत्याचार केला.

हे ही वाचा :- आटपाडी : सिद्धनाथ पतसंस्थेस ५० लाख रुपयांचा नफा : चेअरमन साहेबराव पाटील यांची माहिती

या प्रकरणातील मूळ फिर्यादीमध्ये केवळ १०० ग्रॅम सोने चोरीची तक्रार होती. तपासात दोन किलो सोने हस्तगत केले असताना, पोलिसांनी केवळ ४५५ ग्रॅम सोने रेकॉर्डवर घेतले. उर्वरित १,५४५ ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचा आरोप सागर जगदाळे याने केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. तेली यांनी घेतली असून जगदाळे याच्या तक्रारीत किती तथ्य आहे आणि या प्रकरणामध्ये खरोखरच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे, या बाबत चौकशी करण्याचे आदश दिले असून सागर जगदाळे यास त्याच्या कडील असलेले पुरावे देण्यात आल्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. (स्रोत-लोकमत)

हे ही वाचा :- पोलिसांनीच चोरीतील दीड किलो सोन्यावर मारला डल्ला : करगणी-रामनगर येथील संशयिताची जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!