माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. ०२ एप्रिल २०२३ : आटपाडी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा :- Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सरपंचाची कोयत्याने वार करून हत्या

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपीने अल्पवयीन मुलगी व तिची बहिण खेळायला गेली असता ‘तुझा खावू खायला पैसे देतो’ असे म्हणत विनयभंग केला. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले असता जीवे मारण्याची धमकी दिली. सदरच्या घटनेबाबत मुलीच्या कुटुंबीयाने आरोपीस याबाबत विचारला असता त्यांना ही तुम्हाला काय करायचे करा अशी धमकी दिली.
हे ही वाचा :- Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी तोडले अकलेचे तारे : महात्मा गांधी बाबत पुन्हा वादग्रस्त विधान
पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत आटपाडी पोलिसात आरोपी विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि.सा. कलम ३५४, ३५४(अ), ५०६ बालकांचे लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियम २०१२ सजे कलम ११, १२ प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.