आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे (यशवंतनगर) येथील एकाने पुणे येथे राहत्या खोलीत आत्महत्या केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निंबवडे(यशवंतनगर) येथील बिरुदेव धुळा पिंजारी वय(४५) हे कामानिमित्त पुणे येथे राहत होते.

काल दि. १ एप्रिल २०२३ रोजी दुपारच्या सुमारास पुणे येथे त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि २ एप्रिल रोजी निंबवडे यशवंतनगर येथे अत्यसंस्कार करण्यात आले. आत्महतेचे कारण समजू शकले नाही.