माणदेश एकसप्रेस न्युज : दि. ०२ एप्रिल २०२३ : पुणे : पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील शिरगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मावळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा :- वहिनीचा विनयभंग : दीरा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव च्या प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी प्रवीण गोपाळे (वय ४७) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.
हे ही वाचा :- आटपाडी : लेंगरेवाडी कुत्रे आडवे आल्याने झाला अपघातात : एकाचा मृत्यू
शनिवारी रात्री प्रवीण हे साई बाबांच्या मंदिरासमोर आले तेव्हा त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी धारदार कोयत्याने हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर सपासप वार करण्यात आले करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
घटने नंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सीसीटीव्हीद्वारे पोलिस घेत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायत ची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी गटाचे प्रवीण गोपाळे हे सरपंच पदी विराजमान झाले होते.
हे ही वाचा :- Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी तोडले अकलेचे तारे : महात्मा गांधी बाबत पुन्हा वादग्रस्त विधान