Latest Marathi News

BREAKING NEWS

IPL 2023, LSG vs DC : लखनऊ सुपर जायंट्सच्या काइल मेयर्सने ची फटकेबाजी अन मार्क वूडचा पंजा : दिल्लीचे शेर झाले ढेर

0 159

IPL 2023, : LSG vs DC : लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या काइल मेयर्सने ची फटकेबाजी अन मार्क वूडचा विकेटचा पंजा पुढे दिल्लीचे शेर झाले ढेर झाले अन लखनऊ सुपर जायंट्सने विजय प्राप्त केला.

इकाना स्टेडियमवर खेळताना लखनऊने शानदार फलंदाजी करत २० षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य मिळाले. लखनऊकडून वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने ३८ चेंडूत सर्वाधिक ७३ धावा करत तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि सात षटकार मारत गोलंदाजांना अक्षरशः धू-धू धुतले. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनने २१ चेंडूत झटपट ३६ धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकारांचा साज चढवला. आयुष बडोनीने शेवटच्या षटकात येत ७ चेंडूत आक्रमक १८ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार मारले.

Manganga

या दोघां व्यतिरिक्त फारशी मोठी खेळी एकाही फलंदाजाला खेळता आली नाही. दीपक हुडा १७, मार्कस स्टॉयनिस १२ आणि कर्णधार केएल राहुल ८ धावा करून बाद झाले. कृणाल पांड्या १३ चेंडूत १५ धावा करून नाबाद राहिला आणि कृष्णप्पा गौतमने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत १९३ पर्यंत धावसंख्या पोहचवली. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.
१९४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी ने कर्णधार डेविड सोबत शानदार सुरुवात केली. परंतु ४१ धावा झाल्या असताना मार्क वूड ने पृथ्वी व त्यापाठोपाठ मिश मार्श यांना बाद करत सामन्यात खळबळ उडवून दिली.

एका बाजूने कर्णधार डेविड वॉर्नर ने एक बाजू लावून धरली असली तरी दुसऱ्या बाजूने फलंदाज फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम करत होते. दिल्लीच्या ८ फलंदाजाना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शेवटी त्यांचा १४३ धाववर डाव आटोपला. लखनऊ कडून मार्क वूडने ४ षटकात १४ धावा देत ५ फलंदाज माघारी धाडले. तर रवी बिष्णोई व आवेश खान यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

हे हि वाचा :- IPL 2023 : PBKS vs KKR : DLS च्या नियमानुसार पंजाबचा कोलकातावर ७ धावांनी विजय

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!