पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ या म्हणीचा प्रत्यय राजकारणात सुद्धा आला आहे. कारण पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले अन ते चर्चेचा विषय बनले. कारण, एक एप्रिल हा “एप्रिल फुल” दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोट्या विकासाचा वाढदिवस म्हणून पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँगेस ने आज साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींचा विकास म्हणजे फसवा असून, गेल्या आठ वर्षात ‘अच्छे दिन’च्या नावाखाली त्यांनी आणि भाजपने भारतीय जनतेला ‘एप्रिल फुल’ केले आहे, असा हल्लाबोल करण्यात आला.
हे हि वाचा :- Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी तोडले अकलेचे तारे : महात्मा गांधी बाबत पुन्हा वादग्रस्त विधान

खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालयात शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात एक एप्रिल हा ‘एप्रिल फुल’चा दिवस हा मोदीचा खोट्या विकासाचा वाढदिवस” म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी “एकच भूल, कमळ का फुल, देशाला केले एप्रिल फूल” अशा विविध घोषणा देण्यात आल्या. माजी नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, शाम लांडे, कार्याध्यक्ष फजल शेख,शहर प्रवक्ते विनायक रणसुंबे आदींसह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हे हि वाचा :- Video : साडी नेसून महिलांनी गाजवलं फुटबॉलचं मैदान : व्हायरल Video पाहून तुम्हीही कराल कौतुक
“पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आहे त्या नोकऱ्या गमवायची वेळ महाराष्ट्रासह देशातील तरुणांवर आली असून मोदी आणि भाजपने तरुणांना एप्रिल फूल केले आहे. ना शिवस्मारक तयार झाले, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला, ना लोकांना पंधरा लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊदला फरफटत आणले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरचे अत्याचार थांबले, ना डॉलर ४० रुपयांचा झाला, ना बाबासाहेबांचे स्मारक तयार झाले आणि ना अच्छे दिन आले! अशा प्रकारे पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना एप्रिल फुल केले आहे. मात्र निवडणुकीत मतांच्या रूपाने भाजपला जनता नक्कीच ‘एप्रिल फुल’ बनवेल, असे शेख यावेळी म्हणाले.
हे हि वाचा :- पोलिसांनीच चोरीतील दीड किलो सोन्यावर मारला डल्ला : करगणी-रामनगर येथील संशयिताची जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार