Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी तोडले अकलेचे तारे : महात्मा गांधी बाबत पुन्हा वादग्रस्त विधान
Kalicharan Maharaj : वादग्रस्त विधानाबाबत प्रसिद्ध असलेल्या कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा आपल्या अकेलेचे तारे तोडले आहेत.
“नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे,” असे विधान त्यांनी केल्याने वाद निर्माण केला आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते योग्यच केले, जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असा विश्वास कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला आहे.

या अगोदरही कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल हरिद्वारच्या धर्मसंसदेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. त्याच बरोबर कोरोना काळात त्यांनी लसीकरण, जागतिक आरोग्य संस्था (WHO) याबाबत वादग्रस्त विधान केले होते. जागतिक आरोग्य संस्था (WHO) ही बनावट संस्था आहे आणि या संस्थेतील कर्मचारी डॉक्टर, वैज्ञानिक सगळे आमच्या दृष्टिकोनातून बनावट आहेत, असं ते म्हणाले होते.