माणदेश एक्सप्रेस न्यूज :दि. ०१ एप्रिल २०२३ : म्हसवड : येथील मौजे लोणार खडकी ता. माण येथे दि ३१ मार्च रोजी दिरानेच आपल्या वहिणीचा विनयभंग करुन लाथा बुक्क्यानी मारहान करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार विवाहित महिलेने म्हसवड पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार नितीन किसन खांडेकर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी ही घराचे समोर भांडी घासत असताना फिर्यादीचा दिर नितीन किसन खांडेकर याने पाठी मागून येवून मिठी मारुन, हाताला धरुन मनास लज्जा उत्पंन्न होईल असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचा मोबाईल फोडुन फिर्यादीला हाताने लाथाबुक्याने मारहन करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे आरोपी नितीन किसन खांडेकर रा. खडकी. ता. माण जि.सातारा यांचे विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून सदरच्या गु्ह्याचा तपास सपोनि राजकुमार भूजबळ यांचे मार्गदर्शनाखाली एम.एन.हांगे मपोना करत आहेत.